──────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────
● सातारा ▬
● वृक्ष लागवडीसाठी वाघजाई देवराईत तरुणाईचा उत्साह.
╔═══════ ══════╗
जागतिक पर्यावरण दिनापासून
वृक्षलागवडीस
नव्याने शुभारंभ.
╚═══════ ══════╝
मौजे धामणी ता.माण जि.सातारा या ठिकाणी कोरोनाग्रस्त संकट काळातही अनेक समस्यांना तोंड देत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षप्रेमी वृक्षमित्र मा.सतेशकुमार माळवे सर व मा.प्रकाश खाडे यांच्या मार्गदर्शन व सक्रिय सहभागातून वृक्षलागवडीस शुभारंभ हा करण्यात आला. धामणी व इतरही अनेक गावात प्रसिद्ध असणारे आणि सर्वदूर जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या या वाघजाई देवी मंदिर परिसरात योग्य सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करीत यशस्वी वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.सुरक्षितअसे योग्य अंतर राखण्यासाठी प्रत्येकी फक्त दोघा-दोघा व्यक्तीच्या एक गटामध्ये एक खड्डा खोदण्यासाठी देण्यात आला होता.झाडे लावण्यासाठी योग्य अंतर ही नियोजित केले होते. त्यानुसार जास्तीचे अजिबात एकत्र न येता, खूपशी काळजी घेऊनच खड्डे खोदाईचे हे काम व वृक्षारोपण श्रमदानातून केले. त्या खड्डयात काळ्या मातीने भरण ही केले आणि यात पिंपरणी सारख्या झाडांच्या योग्य अशा निवडक फांदयाची व चिंचेच्या झाडांची लागवड केली.त्याला लगेचच पाणी ही घातले गेले. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात ही असणाऱ्या सह्याद्री देवराईत नव्याने काही झाडे लावून तेथे सुध्दा आणखी वाढीव वृक्ष लागवडीस प्रारंभ केला. त्यामुळे सिनेअभिनेते मा. सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतील धामणी गावच्या या सह्याद्री देवराईला आता चांगले बाळसे व गती येऊ लागली आहे.अजूनही काही ठिकाणी आणखी जेसीपीच्या माध्यमातून खड्डे खोदून त्यात वृक्षारोपण केले जाणार आहे.या वृक्ष लागवड मोहिमेत तरुणाईचा ही प्रचंड मोठा उत्साह दिसत आहे.या वृक्ष लागवडीच्या महत्त्वपूर्ण कामी वैभव खाडे,निलेश खाडे, राजू खाडे,सुधाकर नाकाडे,विजय खाडे,बाबुराव खाडे,सागर खाडे,तुषार खाडे,जयवंत खाडे, नाथा खाडे, तुषार नागरगोजे ह्या सर्व तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व ते या कामी उत्तम प्रकारचे सहकार्य करीत आहेत.त्यामुळे ही वृक्ष लागडवडीची मोहीम यशस्वी होत आहे.त्याचबरोबर योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेऊन पर्यावरण दिनी सह्याद्री देवराईत मागे लावण्यात आलेल्या सर्व जुन्या वृक्षांना खाजगी टँकरद्वारे पाणी घालण्याचे काम ही सतेशकुमार माळवे, प्रकाश खाडे, बाबुराव खाडे, सुधाकर नाकाडे व विजय खाडे यांनी केले.अशा ह्या बहुमोलअशा समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यात सह्याद्री देवराई प्रकल्पाचे उदगाते मा. सयाजी शिंदे,पुणे येथील भूमीसंपादन अधिकारी मा.सुरेखाताई माने मॅडम, पाणी फाउंडेशनचे उच्चस्तरीय समन्वयक मा.अजित पवार,सह्याद्री देवराईचे समन्वयक मा.योगेश गायकवाड , माण तालुका व धामणी गाव पाणी फाउंडेशन टीम आणि अनेक ठिकाणच्या वृक्षप्रेमी मंडळींनी तसेच धामणी गावातील अनेक ग्रामस्थांनी सोशल मीडिया व फोनद्वारे या वृक्षारोपण मोहिमेचे जोरदार असे समर्थन करून कौतुक केले आहे.
╔═══════ ══════╗
वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा.
╚═══════ ══════╝