──────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────
● सातारा.-( विनायक भिसे) ▬
╔═══════ ══════╗
सहकारी बँकांनी ठोस भुमिका घ्यावी.
सहकार भारतीचे राष्ट्रीय
महामंत्री डॉ. उदय राव जोशी
यांंचे आवाहन.
╚═══════ ══════╝
सहकार भारतीच्या केंद्रीय कार्यकारिणीची नुकतीच रविवारी सात जूनला झालेल्या बैठकीत झूम तंत्रज्ञानात द्वारा पुढीप्रमाणे ठराव एकमताने संमत करण्यात आला .
अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य होते बैठकीतील सविस्तर चर्चेनंतर सदर ठराव नागरी सहकारी बँकांच्या सर्व असोसिएशन्स फेडरेशन इत्यादींना पाठवावा असेही ठरविण्यात आले. नागरी सहकारी बँकांचे संपूर्ण नियंत्रण नाबार्ड कडे देण्यात यावे. यासंदर्भात प्रामुख्याने महाराष्ट्रात निष्कारण यावर नुकतीच चर्चा झाली .अर्थात हे दुर्दैवी आहे. फार पूर्वीच सहकारी बँकांनी त्यांच्याकरिता रिझर्व बँकेचे शिवाय स्वतंत्र नियंत्रण करणारी संस्था असण्याची चर्चा धुडकावून लावली आहे.
नागरी सहकारी बँकांवर पूर्णपणे रिझर्व बँकेचे नियंत्रण असावे यावे याकरिता बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मध्ये हे सुधारणा करण्याबाबतचे विधेयक एक्स लोकसभेत मंजूर झाले आहे. व लवकरच असते हे येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेतही ही मंजूर होईल गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नाने हे विधेयक भारत सरकारने सादर केलेले आहे सदर विधेयक मंजूर झाल्यानंतर जेव्हा सहकारी बँकांना वृद्धी आणि विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि आर्थिक संकटाच्या वेळी बँका आणि ग्राहकांचे संरक्षण करणे हे देखील शक्य होणार आहे तेव्हा नियंत्रण म्हणून नाबार्ड चा प्रस्ताव आणणे दुर्दैवी व अप्रस्तुत आहे.
सदरचा प्रस्ताव सहकार भारती पूर्णपणे फेटाळत असून सर्व सहकारी बँका असोसिएशन व फेडरेशन यांना आवाहन आहे ,की त्यांनी देखील हा प्रस्ताव फेटाळावा.
असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय राव जोशी यांनी सर्वांना केले आहे.
╔═══════ ══════╗
वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा.
╚═══════ ══════╝ .