────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
────────────
● आटपाडी ; प्रतिनिधी ▬
आटपाडी तालुक्यामध्ये कोरोना चे 24 रुग्ण आढळल्याने व दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे तसेच झरे गावी कोरोणा बाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषालीताई धनंजय पाटील व ॲडव्होकेट श्री. धनंजय लक्ष्मणराव पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्ड नंबर 1 ते 6 मध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रबोधन करणेकामी दौरा सुरू केलेला आहे.
╔═══════ ══════╗
आटपाडी च्या सरपंच सौ, वृषाली
धनंजय पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
╚═══════ ══════╝
आटपाडी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड नंबर 1 मधील हाकेमळा व मगरवस्ती
परिसर येथे परगावाहून आलेले तसेच तेथील उपेक्षित, वंचित, घटकातील कुटुंबीयांना कोरोना पासून काळजी कशी घ्यावी, कोण कोणती दक्षता घ्यावी, ताप, सर्दी ,खोकला अशा आजारांपासून दूर कसे राहावे, अशी आस्थेवाईकपणे चौकशी केली व संपूर्ण परिसर सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत होम टू होम* पायाखाली घालून येथील सर्वच नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन, त्यांना सोडविण्याचा दिलासा दिला. शिवाय सर्वांनी स्वच्छता पाळा, विनाकरण घर सोडू नका, आरोग्याची काळजी घ्या असा आपुलकीचा सल्ला दिला.
तसेच आटपाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वॉर्डांमध्ये तसेच क्वारंटाईनट केलेल्या लोकांशी आस्थेवाईकपणे जनजागृती करण्याच्या कामाचा वेग वाढवला.
कोरोना विषयी कधीही फोन करा आम्ही तुमच्या सेवेशी धावून येऊ असेही पाटील यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी हाकेमळा या ठीकाणी ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब मेटकरी, ग्रामसेवक श्री. दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी श्री सुधीर भिंगे तसेच श्री. मनोज देशपांडे, श्री सुखदेव पाटील उपस्थित होते.
आशा सेविका व अंगणवाडी सेविका जीवाची पर्वा न करता गावाची आरोग्य सेवा प्रामाणिक करत असल्याबद्दल सरपंच वृषाली पाटील व श्री धनंजय पाटील वकील यांनी नागरिकांच्या समोर सेविकांच्या प्रामाणिक कामाबद्दल गौरवोद्गार काढले
╔═══════ ══════╗
वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा.
╚═══════ ══════╝ .