![]() |
| प्रा.आ.केंद्र. केडंबे. |
──────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────
मेढा(धनंजय गोरे):-
●नियोजन समिती सदस्य एकनाथ ओंबळे यांच्या पाठपुराव्याला यश
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, व शिवसेना सातारा मतदारसंघ संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या प्रयत्नातून केडंबे येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुरूस्ती साठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
केडंबे येथील आरोग्य उपकेंद्राची जागा अपुरी असल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे श्री. एकनाथ ओंबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याचे श्री. एकनाथ ओंबळे यांनी सांगितले. या निधीतून उपकेंद्राची दुरूस्ती करण्यात येणार असून यामध्ये शस्त्रक्रिया गृहाचे बांधकाम, रंग रंगोटी ,दुरुस्ती इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. उपकेंद्राच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एकनाथ ओंबळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
