──────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────
औंध(वार्ताहर):-
औंध व जायगाव येथे औंध येथील एंजेल फांऊंडेशनच्यावतीने सुमारे दोनशे गोरगरीब गरजू कुटुंबाना अमर जाधव यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जायगावच्या सरपंच विजया देशमुख, रमेश देशमुख, सर्पमित्र चंद्रकांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्या विजया चंद्रकांत शिंदे,प्रसाद गुरव, हर्षद घार्गे, अनिकेत वायदंडे, नवनाथ गुरव,आकाश शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जायगावचे रमेश देशमुख म्हणाले की, एंजल फाऊंडेशनचे ग्रामीण भागातील जनतेला कोरोनाच्या साथीमध्ये आधार देण्याचे काम निश्चितच आदर्शवत आहे. त्यांनी जायगाव, औंध येथील गोरगरीब कुटुंबाना पडत्या काळात दिलेला आधार हा अन्य संस्था व तरूणाईसाठी मार्गदर्शक आहे. यावेळी त्यांनी एंंजल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम, कार्यक्रमांची माहिती घेतली.
यावेळी एंजल फांऊंडेशनचे सदस्य अमर जाधव म्हणाले की, जनतेला कोरोनाच्या काळात मदतीची गरज आहे. त्यादूष्टीने आम्ही सर्व सदस्य प्रयत्न करत आहोत. यापुढील काळातही पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचारी यांना विविध सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार आहे अशी माहिती देऊन गरीब विद्यार्थी, आजारी रुग्ण तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ही मदत करण्यासाठी फांऊंडेशन मार्फत प्रयत्न करणार आहोत. सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे,प्रसाद गुरव यांनी केले.
फोटो. औंध येथील एंजल फाऊंडेशनचे जीवनावश्यक साहित्य वाटप करताना रमेश देशमुख, सरपंच विजया देशमुख, अमर जाधव, चंद्रकांत शिंदे व अन्य