आटपाडीच्या भ्रष्ट वनक्षेत्रपाल यांना निलंबित करण्याची शेखर रणदिवे यांची मागणी.



─────────────
   🌍 ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────

आटपाडी प्रतिनिधी

     महाराष्ट्र सरकारच्या 50 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षलागवडमध्ये आटपाडी तालुक्यातील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र यांना लागवडीचे टार्गेट आले होते, सदर तालुक्यातील वनक्षेत्रपाल यांनी तालुक्यामधील अनेक गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केलेली आहे, परंतु मागील दोन वर्षापासून फक्त कामाची बिलेच काढली जातात, वृक्ष लागवड ही फक्त कागदावरच आहे..!
    वृक्ष लागवडीच्या नावाखाली यांनी महाराष्ट्र सरकार व तालुक्यातील तमाम जनतेची फसवणूक केलेली आहे, सामाजिक वनिकरणाच्या विरोधात या आगोदर तालुक्यातुन बरीच निवेदन देन्यात आली, परंतु सामाजिक वनिकरणाने संबंधित तक्रारदाराला राजकीय दबाव टाकून किंवा पैशाची लालच दाखवून माघार घ्यायला लावली, तरी अशा या भ्रष्टाचारी वनक्षेत्रपालास तातडिने निलंबित करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

╔═══════                            ══════╗

आजपर्यंत वृक्षलागवड केलेली झाड गेली कुठं??
    आजपर्यंत शासनाने अतिशय चांगल्या वृक्षलागवडीच्या योजना आणल्या आहेत, काही वनविभागाच्या कर्तव्यदक्ष वन अधिकारी चांगले काम करतात परंतु आटपाडी तालुक्यातील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या अनेक कारनाम्यांमुळे महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड योजनेलाच हरताळ फासला जात आहे..!

╚═══════                             ══════╝

     यामुळे पर्यावरण प्रेमींकडून सुध्दा या वनविभागान केलेल्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जर ही वृक्षलागवड 100% झाली असती तर आजच चित्र वेगळं दिसलं असते, शासन दरवर्षी लाखों झाडांचे वृक्षारोपण करत असताना कोट्यवधी निधी खर्च करत आहे ,मग दरवर्षी लावली जाणारी झाड जात तरी कुठे?? हा प्रश्न अनेक पर्यावरण प्रेमी व सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे . जर हे थांबवायचे असेल कामचुकार, भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळीच कारवाई करून वनविभागाच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणल्यास आटपाडी तालुक्यात नक्कीच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन नक्कीच वाढेल व आटपाडी तालुक्यात वनराई नक्कीच वाढेल असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत असते.