नियमित वीजबिल भरणाऱ्यांना भुर्दंड"
──────────
*🌍 ग्रामीण महाराष्ट्र न्युज*
────────────..
...देवापुर: विशाल माने
महावितरण कंपनीच्या म्हसवड उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या देवापुरमध्ये डी पी खाली शॉक लागून 8 शेळ्या ठार झालेली घटना ताजी असतानाच .वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने देवापूर सह परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असुन महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना, नियमित वीजबिल धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.. कोरोनाच्या विळख्याने माणदेशी तरुण वर्क फ्रॉम होम करत असताना विजेच्या लपंडावाने त्रस्त आहेत. पाऊस व वाऱ्याने वीज वारंवार जात असल्याने विशेषत लॅपटॉप वर काम करणाऱ्या अभियंत्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
या 33/11 केव्ही उपकेंद्रातुन म्हसवड परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. वीज बहुतांशी खंडीत राहत असल्याने परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांचे हाल होत आहे. सध्या भारनियमन नसतांना सुद्धा दररोज लाईट अधूनमधून जातेच त्यात ही दिवसभरात किंवा रात्री अपरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या गलथन कारभाराला वैतागले आहेत.या देवापुर परिसरातील 20 गावातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी फक्त एक अभियंता,3 कर्मचारी व 8 कंत्राटी ऑपरेटर कार्यरत आहेत. देवापुर वीज कार्यालय अंतर्गत असणाऱ्या 20 गावांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच देवापुर् सह परिसरात बोगस वीज धारकांचा सुळसुळाट असल्याने व व्यवस्थापन अशा ग्राहकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना बुर्दुंड बसत आहे.अशातच बोगस विजधारक व कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याच्या चर्चेला उधाण येतं आहे .
.. ╔═══════ ══════╗विद्युत तारा व खांब झाले जीर्ण :-
देवापूर व परिसरात1972 मध्ये पोल व वीज तारांचे कामकाज पूर्ण करण्यात आले होते तेंव्हा पासून आजपर्यंतच्या 50 वर्षाच्या कालावधीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा तसेच खालून गंजलेले खांब बदलण्याची तसदी सुद्धा महावितरणने घेतली नाही.सध्या वादळी वाऱ्याचे दिवस असल्याने हे वीज खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जीर्ण झालेल्या खांबावरील विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्याने धोक्यात वाढच होत आहे. त्यातच कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय अंतर्गत असणाऱ्या ठान बद्ध शेळी प्रकल्पातील 8 शेळ्या विजेच्या धक्क्याने मरण पावल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून अशा घटना वारंवार घडल्यास यास जबाबदार कोण? अशा चर्चांना उधाण आले आहे .
╚═══════ ══════╝
