पीएसआय शहाजी गोसावी यांना विशेष सेवा पुरस्कार.


.




मायणी:- दत्ता कोळी

राज्यातील नक्षलवादी भागात विशेष कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. खटाव तालुक्यातील मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी चंद्रकांत गोसावी यांना सदर पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
      महाराष्ट्रातील गोंदिया, चंद्रपूर ,भंडारा व गडचिरोली हे जिल्हे नक्षलवादी क्षेत्र म्हणून ओळखले जातात. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी गडचिरोली या अतिदुर्गम भागात दि. १२ मार्च २०१५ ते ४ ऑगस्ट २०१८या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते. या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते,म्हणून त्यांना केंद्र शासनाच्या वतीने डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र स्टेट ,मुंबई यांनी सदर पुरस्कार जाहीर केला आहे. या पूर्वीही गडचिरोली येथे विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, पोलीस निरीक्षक अशोक पाटील व अनेक मान्यवरां कडून अभिनंदन करण्यात येत आहे.