इंदापूर : प्रतिनिधी (दि. २५ ) जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सदस्य प्रविण माने यांनी आपला वाढदिवस तालुक्यात रक्तदान शिबिर आयोजित करुन तरुणांपुढे एक आदर्श निर्माण करून विक्रमी कार्य करणाऱ्या प्रविणभैय्या माने युवामंचला शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट, अक्षय ब्लड बँक, पंढरपूर ब्लडबँक, भारतीय जैन संघटना व लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशनच्या वतीने आज ( दि. २५) रोजी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. देशामध्ये आलेल्या कोरोनासारख्या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर, रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवीण भैय्या माने युवा मंच व श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने संपूर्ण इंदापूर तालुक्यात रक्तदान शिबिर घेऊन विक्रमी रक्तदान पार पाडले.
या रक्तदान शिबिर कार्यात अहोरात्र झटलेल्या सर्व मित्रपरिवार व माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे, शिवशंभु ट्रस्ट इंदापुर तालुका अध्यक्ष मनोज राक्षे, भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन बोगावत, अक्षय ब्लड बँकचे संजय शिंदे, पंढरपूर ब्लड बँकचे प्रसाद खाडिलकर व सागर जाधव, लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर आवटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म.राज्य प्रदेश सरचिटणीस अमरसिंह मारकड , कमलेश गांधी, अमोल गायकवाड, राहुल भिसे, भिगवण शहर संपर्कप्रमुख विशाल धुमाळ, भिगवण शहर अध्यक्ष सुरज पुजारी, किशोर फलके, आनंद केकान, राहुल ढवळे, विशाल करडे, अक्षय खारतोडे उपस्थित होते.