वडापूरी : (महेंद्र चौधरी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती, जि.प. सदस्य प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्यानिमित्ताने प्रविणभैया माने युवामंच व शिवशंभू चॅरिटेबलच्या ट्रस्टच्या माध्यमातून आज (दि.२५) रोजी जांब ता. इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले. यावेळी रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास वीस लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रविण माने म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगावर उद्भवलेल्या या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपण शक्य त्या साऱ्याच गोष्टी करत असून, राज्याच्या रक्तपेढीची तूट भरून काढणे, नागरिकांना सॅनिटायझर व मास्क वाटप हेच त्यातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर होत असतो. अश्यावेळी नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने यांनी व्यक्त केले.
यावेळी धनाजी रूपनवर, तानाजी रूपनवर, सुरेश पाटील, बाळासाहेब रूपनवर, सर्जेराव पाटील, अनील पांढरे, अमरसिंह मारकड पाटील, योगेश डोंबाळे पाटील, अमर रूपनवर, संदीप पाटील, आदित्य रूपनवर, समर रूपनवर, रोहित रुपनवर, किशोर रूपनवर, अभिजीत भिसे, आमोल पाटील, अजीत रूपनवर, नितीन पाटील, सागर रूपनवर, सागर पाटील, अनिकेत रूपनवर, अण्णा पांढरे, संदेश पाटील, सुरज खुसपे, अमोल पाटील, किशोर पाटील, समीर पाटिल, अजय भिसे, अजित रूपनवर, जांब गावचे ग्रामस्थ व इतर सहकारी मान्यवरही उपस्थित होते.