इंदापूर : प्रतिनिधी (दि. २५)
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा (दि. २४) रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पिंपरी खु. येथील अमोल नरुटे ( नायब तहसीलदार पद), कळाशी येथील सुषमा रेडके (नायब तहसीलदार पद), काटी येथील पूजा गोरे ( नायब तहसीलदार पद), काटी येथील अमोल मोहिते (उपशिक्षणाधिकारी पद) आणि बाभूळगाव येथील मनोजसिंह खिलारे ( पोलीस उपनिरीक्षक पद) हे नूतन अधिकारी यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.पाटील यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत इंदापूर तालुक्यातील या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे यश मिळवले असून याचा इंदापूरकरांना सार्थ अभिमान असल्याचे सांगून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.