सराटी (ता. इंदापूर) येथे कोकाटे कुठुंबा ने स्त्री जन्माचे केले स्वागत .


                  इंदापूर : प्रतिनिधी   


                                                              मुलगा म्हणजे घराण्याचा कुलदीपक मानत, प्रसंगी स्त्रीगर्भाची भ्रूणहत्या केली जात असल्याची वृत्ते आपण ऐकतो. परंतु  इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील कोकाटे यांच्या कुटूंबात जन्माला आलेल्या कन्येचे पायघड्या घालून पुष्पवर्षाव करत व मातेच्या गळ्यात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. आरती व अमोल कोकाटे यांचे हे पहिलेच अपत्य आहे. कन्या जन्माला आली. त्याचा आनंद या दांपत्याने कृतीतून व्यक्त केला. चुलते बाबासाहेब कोकाटे, प्रदीप कोकाटे, विशाल कोकाटे, चुलती ऋतुजा कोकाटे, मामा चेतन जगदाळे, आजी विजया कोकाटे, राजश्री जगदाळे, सीमा कोकाटे, आजोबा विठ्ठल जगदाळे, हनुमंत कोकाटे, आत्या ऋतुजा कोकाटे या जल्लोषात सहभागी झाले होते.