इंदापूर : प्रतिनिधी
कालठण नं.१ ता. इंदापूर येथील विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूटमधील श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थिनीने भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाने घेतलेल्या परिक्षेत उत्तम यश मिळवले. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील ऐंशी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये श्रुती जगताप हिचा समावेश आहे.
इंदापूरच्या विश्व प्रतिष्ठानमार्फत जिजाऊ इन्स्टिट्यूट चालवले जाते. प्रा.डॉ.जयश्री गटकुळ संस्थेच्या अध्यक्षा आहेत.संस्थेच्या वतीने दर्जेदार शिक्षण दिले जाते.यामुळे बारावी विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले आहे.जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेत ही श्रुतीने मिळवलेल्या यशामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ,डॉ.भास्कर गटकुळ यांनी श्रुतीचे व तिला मार्गदर्शन करणा-या प्राचार्या राजश्री जगताप,शेखर साळवे,रेखा जगताप,सुहास शिंदे, अर्चना शिंदे,प्रियांका देवकर, असिया शेख,सागर उंबरे यांचे अभिनंदन केले आहे.