इंदापूर : वार्ताहर
सोशल डिस्टन्सींग पालन करुन प्रवास.
बस निर्जंतुकीरण करण्यात येते.
शासन नियमांचे पालन करून इंदापूर आगारातून आज ( दि १५) पासून बारामती या मार्गावर सकाळी तीन, दुपारी तीन अशा सहा फेऱ्या सुरु केल्याचे आगार वाहतुक नियंत्रक विक्रम चंदनशिवे यांनी जनदूत न्यूज २४ शी बोलताना ही माहिती दिली. श्री. चंदनशिवे पुढे म्हणाले की, आगारातून बारामती करिता सकाळी सात वाजता, आठ वाजता, नऊ वाजता तर दुपारी साडेबारा वाजता, तीन वाजता, सव्वाचार वाजता या वेळा पञकानुसार गाड्या मार्गस्थ होणार असल्याचे त्यांनी सांगितले . तसेच हडपसर या मार्गावर प्रवाशांची संख्या तीस असल्यास याही ठिकाणी एस टी बस सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी दररोज सफाई कामगारांकडून बस मार्गस्थ होण्याअगोदर आणि बस परत आगारामध्ये आल्यानंतर बस पूर्ण निर्जंतुककिरण करण्यात येत असल्याची माहिती आगाराच्या सूञांकडून सांगण्यात आली.
╔═══════ ══════╗
आज सकाळी नऊ वाजता
इंदापूर ते बारामती येथे बसची
पहिली फेरी पूर्ण करण्यात आली.
यावेळी बसमध्ये एकूण
पंधरा ते वीस प्रवाशांनी प्रवास
केला. यामध्ये अजून प्रवाशांची
संख्या वाढेल असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
╚═══════ ══════╝
