सातारा.(विनायक भिसे).
महाबळेश्वर तालुक्यातील डॉक्टरांनी सामाजिक भावनेतून एकत्रित येत, कोरोना च्या लढाईत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.पाचगणी मधील डॉक्टर अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 23 डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन महाबळेश्वर, वाई,जावली, या परीसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचीसेवा करुन आपणही समाजाचे देणे आहोत या भावनेने निस्पपृहपणे मोफत सेवा केली. त्यांचे हे काम समाजाला प्रेरणादायी आहे.
कोरोना ने भयभीत झालेल्या नागरिकांना तालुक्यातील 23 डॉक्टरांच्या खाजगी सेवा करणाऱ्या समूहाने एका अर्थाने हे डॉक्टर म्हणजे युद्धच यांनी समाजाला आशेचा किरण दाखवला स्वयंस्फूर्त सेवेतून मोफत सेवा करुन सामाजिक भाव जपला आहे.
डॉ.अभय देशपांडे यांनी आपल्या वैद्यकीय मित्रांना आवाहन केले त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रेरित भावनेने प्रेरित होऊन कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेक जण स्वयंस्फूर्तीने उतरले आहेत.
डॉक्टर देशपांडे यांच्यासोबत डॉक्टर शितल गवळी ,डॉक्टर सुहास जंगम ,डॉक्टर विशाल पारठे, डॉक्टर आशिष चोपडे, डॉक्टर किरण कदम ,डॉक्टर सलीम मानकर ,डॉक्टर नदीम डोंगरे, डॉक्टर अब्दुल मानकर ,डॉक्टर विराज, डॉक्टर महेंद्र भिलारे, डॉक्टर डांगे ,डॉक्टर अरुण भिलारे ,डॉक्टर महेश भिलारे, अभिषेक दगडे, डॉक्टर प्रतीक्षा मुंगसे ,डॉक्टर प्रतीक फातिमा शेख, डॉक्टर शेटे, डॉक्टर सावरकर, डॉक्टर रसाळ ,या डॉक्टरांची टीम तयार झाली आणि कामाला लागले.
सुरुवातीला रुग्ण प्रमाण हे अत्यल्प . जिल्हा प्रशासनाने वाई,महाबळेश्वर, खंडाळा ,जावळी तालुक्यासाठी पाचगणी मधील बेल एअर मध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होकार दिला.
डॉक्टरांची जबाबदारीही वाढली पण न डगमगता न घाबरता कोरोना चा सामना सुरुवातीला तीन डॉक्टरांनी सुरुवात केली.
कोरोनाबाधितांच्यावर चोवीस तास दिवस रात्र उपचार करु लागली.
नियोजन नियोजनबद्ध रीतीने डॉक्टरांनी सुरू केले होते. अहोरात्र डॉक्टरांची टीम दवाखान्यात राहून सेवा देते महाबळेश्वर आरोग्य विभाग, पालिका, पोलीस प्रशासन, व बेल एअर प्रशासनाचे, सहकार्य लाभत असून पाचगणीच्या केअर सेंटर मध्ये 60 हुन अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
काहींना डिस्चार्ज मिळाला आहे.
डॉक्टर अभय देशपांडे ,डॉक्टर आशिष चोपडे, डॉक्टर शीतल दाभोळे , सात दिवस रात्र रुग्णसेवेचा कालावधी पूर्ण झाला.
त्यानंतर या सर्वांना पाचगणी करांनी त्यांना पुष्पवर्षाव करून शुभेच्छा देत आभार मानले.
सेवेच्या ठिकाणी जात धर्म पंथ हा नसतो. असे या डॉक्टर टीमने दाखवून देऊन आम्ही समाजाचे काहीना काही तरी देणे लागतो.
या भावनेने सर्व डॉक्टर एकत्र आले आहोत व या विरुद्धच्या युद्धाला लढायला.
हा सह्याद्रीचा योद्धा रुपी डॉक्टर अखंडपणे कार्यमग्न झालेले आहेत.
त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे.

