भोडणी येथे रक्तदान शिबिर संपन्न



                   इंदापूर : वार्ताहर 

                               कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने , प्रविणभैय्या माने युवामंच व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज  दि. १५ रोजी  भोडणी ता.  इंदापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या  रक्तदान शिबिराचे उद्घाटन  माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या  हस्ते करण्यात आले.

 या शिबिरात  सहभागी  प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.                                                                याप्रसंगी भोडणी गावचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व इतर  सहकारी मान्यवर उपस्थित होते.                           
 *चौकट : कोरोनाला घाबरून न जाता त्याच्याशी लढा द्या **-प्रविण माने

       रक्तदान शिबिर संपन्न झाल्यानंतर  प्रविण माने  यांनी गावातील विलगीकरण कक्षास भेट दिली. येथील विलगीकरण कक्षात असणार्‍या  लोकांशी संवाद साधताना त्यांनी   कोरोना जीवघेणा ठरत असला तरी असाध्य रोग नाही. संयम व स्वच्छता या प्रभावी अस्त्राने त्याचा नाश करायचा आहे. त्यामुळे घाबरुन न जाता त्याच्याशी लढा द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगत त्यांचे मनोबल वाढवले.