आटपाडी ; प्रतिनिधी
भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी,आटपाडी, जिल्हा सांगली,व महिला आघाडी यांना कळविण्यात येते कि, आदरणीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरुन राज्यत वाढत असणाऱ्या मागासवर्गीय, बौद्ध व भटक्या विमुक्त जमाती अन्याय अत्याचाराचा जाब सरकारला विचारण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात येणार असुन आपण सर्वानी या आंदोलनात दिनांक 17 जून 2020 रोजी सकाळी ठिक 11:00 वा,आटपाडी तहसिल कार्यालय आटपाडी,मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
साहेबराव चंदनशिवे,राखीताई खरात,शितल खरात,सुनंदा मोरे,संजय कांबळे,महेश काटे,आबासो काटे,भिकाजी खरात हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.