.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची नावे पाठवली आहेत. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते.
2019 मध्ये रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासह त्याने इंग्लंडमधील विश्वचषकातील 5 विक्रमी शतकांसह 548 धावा केल्या ज्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा ठरल्या. याशिवाय टी -20 मध्ये 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला, तर कसोटीत दक्षिण आफ्रिका मालिकेत 3 शतकेही ठोकली.
