पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी (अभिजीत लेंभे)
मागील दोन महिन्यापासून जगासह देशात व महाराष्ट्रात आलेल्या करून संकटाने थैमान घातले आहे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता घेताच गर्दी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलीआहे. कोरोना संकट पूर्णपणे टळले नसून त्याचा पूर्ण नाय नाट होईपर्यंत प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडू नये स्वतःबरोबर एकमेकांची काळजी घेत गर्दी करणे टाळावे असे आवाहन उपसभापती संजय साळुंखे नाना यांनी केले आहे.
कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना साळुंखे म्हणाले महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आरोग्यमंत्री राजेश टोपे महाराष्ट्र सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे सरकारच्या आवाहनाला नागरिकांनी वेळोवेळी चांगला प्रतिसाद दिला आहे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, प्रत्येक वेळी मास्कचा वापर करावा ,गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. वेळोवेळी सँनिटायरचा वापर करावा, सोशल डिस्टन चे नियम पाळावे, या सह स्वतःची सुरक्षिता व कुटुंबाची सुरक्षितता राखावी हेच खऱ्या अर्थाने तालुक्याची जिल्ह्याची राज्याची देशाची जगाची सुरक्षिता ठरवणार आहे या कोरोना संकटकाळात महसूल, प्रशासन ,पोलीस विभाग आरोग्य विभाग ,स्वच्छता कर्मचारी अत्यंत चांगले काम करत आहेत त्यां सर्वांना सकारात्मक प्रतिसाद देणे प्रत्येक नागरिकांची मूलभूत जबाबदारी असल्याचे उपसभापती संजय साळुंखे नाना यांनी म्हटले आहे
