आ. शिवेंद्रसिंहराजेच्या माध्यमातून कोरोना बाधित गावांचे निर्जंतुकीकरण


मेढा(प्रतिनिधि):-केळघर परिसरातील केळघर, गवडी ,वरोशी येथे आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कोरोना बाधित क्षेत्रात व केळघर बाजारपेठेत ,प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर व केळघर गावात सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली.
परिसरात कोरोना बधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत असताना बाधित क्षेत्रातील संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण आमदार भोसले यांच्या वतीने करण्यात आले.                     

     सातारा नागपरिषदेच्या अग्निशमन बंब सॅनिटायझर ने भरण्यात आला होता. या बंबातील सॅनिटायझर येथील संपूर्ण  बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावात मारण्यात आले. तसेच बाधित क्षेत्रातील गवडी व वरोशी येथेही सॅनिटायझर मारून निर्जंतुकरण करण्यात आले.
या कामासाठी जिल्हा परिषद सदस्या अर्चना ताई रांजणे यांनी आमदार भोसले यांच्या कडे पाठपुरावा केला होता. संपूर्ण बाधित क्षेत्र आमदार भोसले यांच्या प्रयत्नातून निर्जंतुकीकरण झाले आहे. यावेळी येथील बाजारपेठेत फवारणी करताना सरपंच, रवींद्र सल्लक, केळघर सोसायटीचे अध्यक्ष बबन बेलोशे, युवा नेते सुनील जांभळे, अंकुश बेलोशे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.