म्हसवड-प्रतिनिधी :
मुंबई येथील मुळ गाव असलेल्या शिरताव ता. माण येथे आलेल्या दोन रुग्णाचा कोरोना चा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने पुर्ण गाव १४ दिवस सील करण्यात आले आहे.
मुंबई कुर्ला येथून आपल्या गावी शिरताव या माण येथे दहा दिवसा पूर्वी आलेले व होम कॅरंन्टाईन म्हणून असलेले दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आले असल्याचे
काल जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांनी जाहिर केले. यामुळे आज सकाळपासून म्हसवड व परिसरातील अनेक गावात एकच खळबळ उडाली अआहे. प्रशासनाने गाव सील करुन बाहेरच्या व्यक्तीला व गावातील व्यक्तीला प्रशासनाच्या व्यक्ती शिवाय कोणी हि बाहेर जाण्यासाठी बंदी केली आहे. गावात येणारे रस्ते खोदून बंद केले तर काही ठिकाणी काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आले आहेत.
शिरताव, विरकरवाडी, मसाईवाडी, बोनेवाडी, आदी भागातील ६० ते ७०% लोक नोकरी निमित्त कुर्ला , माटुंगा, वरळी, भांडुप आदी ठिकाणी कुटूंबासह राहत होते.
कोरोना व्हायरसच्या भितीने आपला गावच बरा म्हणत चाकरमान्यानी गावाचा रस्ता पकडला.
मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या साधनाने गावाचा रस्ता धरत दहा दिवसा पूर्वी गाव गाठले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
ते कुर्ला येथे ज्यांच्या बरोबर राहत होते त्यांचा मुंबईतच पाॅझीटीव्ह रिपोर्ट आल्या नंतर शिरतावच्या सहा जनांनी गावाकडचा रस्ता धरला होता .
इथे आल्यावर त्रास जाणवू लागल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर यांनी त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते .
शुक्रवारी रात्री उशिरा शिरताव येथील दोघांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आल्याने माणची धडकी वाढली आहे.
मुंबई वाले गावाला यायच्या अगोदर गावामध्ये कोणत्याही प्रकारचा संशयीत रुग्ण नव्हता.
शिरताव गाव हे तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते, शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन या गावात केले जाते, तालुक्यातील साक्षर गाव म्हणून या गावाची ओळख आहे. शासनाचे अनेक पुरस्कार या गावाने प्राप्त केले आहेत. मात्र या गावातील ६०% लोक नोकरी निम्मित मुंबईला असतात. मात्र या मुंबईकरामुळेच या गावात corona चा शीरकाव झाला.
शिरतांव येथील आहेत. दि.२३ रोजी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा अहवाल दिला.
त्यामध्ये दोन बाधित हे माण तालुक्यातील शिरतांव येथील असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने तात्काळ याठिकाणी भेट देवुन सदरचे गाव हे संपुर्ण पणे सिल केले आहे.
यावेळी माणच्या तहसिलदार बाई माने यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सदरचे गाव हे पुढील १४ दिवसांकरीता सिल करण्यात आले असल्याचे सांगुन या गावात कोणी येवु नये तर गावातुन कोणीही बाहेर जावु नये असे आवाहन केले.
यावेळी डीवायएसपी बी.एस.महामुनी, तालुका वैद्यकिय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, गटविकास अधिकारी शेलार, स.पो.नि. गणेश वाघमोडे,पीएसआय अमोल कदम, सरपंच सौ. स्वाती लुबाळ, पोलीस पाटील सुरेश चंदनशिवे, उपसरपंच किरण खळवे, सैनाप्पा लुबाळ, तुकाराम लुबाळ, यासह शिरतांव गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.