उषा चॅरीटेबल ट्रस्ट कडून औषधाचे मोफत वाटप



समाजहिताचे काम करणाऱ्या ट्रस्टने घेतली जनतेच्या आरोग्याची काळजी.



● मेढा(धनंजय गोरे):-आनेवाडी सह परिसरातील अनेक गावात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या उषा चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठि शारीरिक बळ मिळावे या करिता ट्रस्ट ने गावातील सर्व ग्रामस्थाना आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे मोफत वाटप केले
      ट्रस्ट च्या द्वारे गेल्या तीन वर्षात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान दर वर्षी केला जातो, सोबतच गरीब गरजू मुलांच्या शैक्षणिक गरजांच्या बाबत देखील मदतीचा हात पुढे करणाऱ्या या ट्रस्ट ने काळाची गरज ओळखून ग्रामस्थ,आनेवाडी टोल वरील कर्मचारी,पेट्रोल पंप कर्मचारी आशा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सह आत्यवश्यक सेवेतील सर्व घटकाना या गोळयांचे वाटप ट्रस्टचे संस्थापक डॉ. विलास फरांदे यांच्या माध्यमातून करण्यात आले