बाळासाहेब देसाई यांनी सर्व सामान्यांच्या कल्याणार्थ कामे केली : ना.एकनाथ शिंदे
![]() |
| फोटो : पोलादीपुरुष बाळासाहेब देसाई यांच्या शिल्पास शिल्पास अभिवादन करताना मान्यवर. |
....
सातारा : महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळात विविध खात्यामध्ये सह्याद्रीएवढे उत्तुंग असणारे व्यक्तिमत्त्व बाळासाहेब देसाई यांनी भरीव असे काम केलेले आहे. तोच वारसा त्यांचे उत्तराधिकारी पुढे घेऊन जात आहेत.असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील पोवई नाका येथे पोलादीपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भव्य अशा शिल्पाचे स्मारक अनावरण उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.यावेळी शिल्पकार संजय कुंभार यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.पालिकेचे नगराध्यक्ष व उपनागराध्य यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रास्ताविकपर माहिती कथन केले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड.दत्ता बनकर,सभापती, नगरसेवक, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,ओबीसी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई व त्याचे सर्व सहकारी,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत व बाळासाहेब देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष,संचालक व सभासद, पाटण पंचायत समितीच्या सभापती सविता विजय पवार,सर्व पदाधिकारी, अधिकारी, सदस्या मंगल माने,प्रियांका देसाई व महिला,माजी सदस्य सुरेश जाधव (माजी सरपंच केरळ), प्रतापसिंह हायस्कुलचे माजी शिक्षक महेंद्र एकळ, विचारवेध पुरस्कार विजेते अनिल वीर (त्रिपुडी), सुरेश भिसे (नाडे),सम्पदा पवार, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे (खडकी),विश्वास सावंत, विश्वास जाधव (निवकणे), शरद म्हस्के (मारुल हवेली), निवडेचे राजेंद्र सावंत,आनंदा भंडारे, जगन्नाथ सावंत आदी पाटण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर,पाटण तालुका रहिवासी संघ,सातारा येथील ग्रुपचे काळे,जाधव, वीरसरवैगरे अनेक सभासद, साखर कारखाना अधिकारी, पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.अभिवादन करण्यासाठी अनेकांची झुंबड होती.त्यामुळे परिसर फुलून गेला होता. सरतेशेवटी महाराज हॉटेलमध्ये अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. मात्र,तो लवकर संपल्याने उर्वरित लोकांना लेकव्ह्यू हॉटेलकडे जावे लागले.या सर्व गडबडीत काहीजण निघून गेल्याचे दृश्य आढळून आले.
"जडणघडणीत सातारा जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार आणि राजकीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी सार्वजनिक जीवनात प्राधान्य दिले.ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच शेती आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा सातारा जिल्ह्याच्या विकासप्रवासावर उमटला आहे. पोवई नाका हे शहरातील प्रमुख ठिकाण असल्याने येथे उभारण्यात आलेला पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.लोकसेवा,ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये जपण्याचा संदेश या स्मारकातून मिळणार आहे."
....
