ना.जयकुमार गोरे (भाऊ)यांच्या माध्यमातून गारळेवाडी सिद्धनाथ देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त - ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याबद्दल गावात आनंदी वातावरण

  -  


मायणी प्रतिनिधी-------                  -    गजीनृत्य सादर करुन आनंद व्यक्त करताना गारळेवाडीचे ग्रामस्थ( ना.जयकुमार गोरे व  टी .आर. गारळे यांचेही फोटो लावावेत)                           श्री सिद्धनाथांच्या कृपेने मा. ना.जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वातून आणि टी.आर. गारळे साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे श्री सिद्धनाथ देवस्थान गारळेवाडी या पवित्र मंदिरास तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला.दिनांक३१जुलै२०२६रोजी मा. ना. जयकुमार गोरे साहेबांनी गारळेवाडीवरील विशेष प्रेम,,श्रद्धा आणि जिव्हाळा व्यक्त करत श्री सिद्धनाथ मंदिर व मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल पाच कोटींचा निधी एकरकमी मंजूर केला आहे.याबद्दल गजिनृत्य करुन ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.तसेच मारुतीशेठ गारळे,पोलीस पाटील धनाजी गारळे, सरपंच अनिल गारळे,माजी सरपंच पोपट गारळे,संतोष उर्फ बाबुराव गारळे,प्रल्हाद मदने व समस्त ग्रामस्थ यांनी सिद्धनाथाला श्रीफळ वाढविले व आनंद व्यक्त केला.मारुतीशेठ गारळे यांनी ही रक्कम कोणत्या खर्चासाठी आहे ते स्पष्ट केले.        राज्यात अनेक प्रसिद्ध व मोठी देवस्थाने आहेत,त्यापैकी काही देवस्थानांना अद्याप तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मिळालेला नाही.अवघ्या सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या गारळेवाडी सारख्या छोट्या गावासाठी एवढा मोठा निधी मंजूर होणे ही अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे.गारळेवाडीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे टी.आर. गारळे साहेब आणि गावावर विशेष प्रेम दाखवत प्रत्येक वेळी भरीव निधी मंजूर करणारे ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांचे गारळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी जाहीर आभार मानण्यात आले व धन्यवाद देण्यात आले.       यावेळी प्रतिक्रिया देताना टी.आर. गारळे म्हणाले,श्री सिद्धनाथ देव हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो.खटाव,आटपाडी,खानापूर या तिन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर वसलेले गारळेवाडी गावचे ग्रामदैवत असून याठिकाणी पूर्वाभिमुखी हेमाडपंथी मोठे मंदिर आहे.या देवस्थानास सन २०११मध्ये क वर्ग देवस्थान दर्जा देण्यात आला होता.त्यामधून ९०लक्ष रुपयांपर्यंतची लहान सहान कामे झालेली आहेत.तथापि देवस्थानचे जागृत महत्त्व, वाढणारी भाविकांची संख्या, व मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन ना.जयकुमार गोरे (भाऊ ) यांनी देवस्थानास याच वर्षात ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिला.त्यानुषंगाने ग्रामस्थांची मागणी व गरजेनुसार पाच कोटी इतक्या रकमेच्या कामाना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.याबद्दल ग्रामस्थ गारळेवाडी व परिसरातून येणाऱ्या भक्तांकडून ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांना हृदयपूर्वक धन्यवाद देण्यात येत आहेत.श्री सिद्धनाथाच्या कृपा आशीर्वादाने ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांची पुढील वाटचाल निश्चितच दैदिप्यमान होईल अशी प्रार्थना गारळे साहेब यांनी केली.               - वार्ताहर