विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार; महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ स्मारकासाठी निवेदन

 विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार; महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ स्मारकासाठी निवेदन


 मुरुम प्रतिनिधी :

 बसवरत्न पुरस्कार नियोजन समिती, धाराशिव जिल्हा यांच्या वतीने विधान परिषदेवर निवडून आलेले माननीय आमदार **बसवराजजी पाटील** यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा शहर परिसरात १२व्या शतकातील सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे, जातिभेद निर्मूलनासाठी कार्य करणारे आद्यक्रांतिकारक **महात्मा बसवेश्वर महाराज** यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आमदार पाटील यांना समितीच्या वतीने देण्यात आले.


या निवेदनामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात रुजावा, तसेच उमरगा शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर पडावी, या उद्देशाने अश्वारूढ स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. आमदार बसवराजजी पाटील यांनी समितीच्या मागणीची सकारात्मक दखल घेत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष **मा. बापूरावजी पाटील**, बळीराजा पानंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष **शरणजी पाटील**, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष **मिलिंद लातूरे**, भाजप तालुकाध्यक्ष **प्रल्हाद काळे**, **डॉ. सचिन विश्वेकर**, माजी नगरसेवक **एम. ओ. पाटील**, **डॉ. मल्लिकार्जुन खिचडे**, माजी जिल्हा परिषद सदस्य **दिलीप भालेराव**, **डॉ. दत्तात्रय खलंगारे**, नगरसेवक **राजेंद्र पतगे**, **मल्लिनाथ दंडगे** यांची प्रमुख उपस्थिती होती.


तसेच बसवरत्न पुरस्कार नियोजन समितीचे अध्यक्ष **सन्नी पाटील**, सचिव **शिवकांत पतगे**, **बालाजी कुडुंबले**, **करण पाटील**, **संजय म्हेत्रे**, **बालाजी पतगे**, **संदीप लिंबाळे** यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.