छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची दि.५ रोजी ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

 छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची दि.५ रोजी ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

*पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,/अभिजीत लेंभे*

    *पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवन (भावेनगर रोड) पिंपोडे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आली आहे.*

          *राज्यातील सहकार क्षेत्रात दिपस्तंभाप्रमाणे काम करीत ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून ५८ शाखाविस्तार करीत संस्थेने १६०० कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे.सातारा,पुणे,मुंबई,नवी मुंबई, ठाणे,रायगड,सांगली,रत्नागिरी, कोल्हापुर व सोलापूर जिल्हे एवढे विस्तारित कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे कामकाज नामांकित बॅंकेप्रमाणेच सीबीएस प्रणालीद्वारे सुरू असून ग्राहकांना सर्व शाखांमधून  मोबाईल बॅंकिग व डिजिटल बॅंकिग सुविधा देण्यात येतात.अभ्यासू संचालक मंडळ व प्रशिक्षीत सेवक वर्ग असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने अडचणींतील १३ पतसंस्थांचे विलिनीकरण करून ठेवीदारांना दिलासा दिला आहे.ग्रामीण भागातून शहरांकडे झेप घेऊन सक्षम झालेल्या या संस्थेची  सभासद संख्या ८० हजारचे पुढे आहे.तरी सर्व सभासदांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण,व्हा.चेअरमन श्रीकांत शेटे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बी.बी.ढमाळ यांनी केले आहे.*