क्रांतिवीर शाळा पालक सभेत टीव्ही मोबाईल बंद चा नाविन्यपूर्ण ठराव.

 क्रांतिवीर शाळा पालक सभेत टीव्ही मोबाईल बंद चा नाविन्यपूर्ण  ठराव.

 म्हसवड... प्रतिनिधी 

 आजची युवा पिढी अवास्तव  सोशल मीडियामुळे भरकटत  चालली असून विद्यार्थी हित जपण्यासाठी  उपाय म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा  नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड च्या पालकसभेत रात्री  सात   ते साडेआठ या दीड तास  कालावधीत घरातील टीव्ही व मोबाईल पूर्णपणे बंद  करण्याचा ठराव  सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

       नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी क्रांतिवीर नागनाथ अण्णा  नायकवडी शाळा म्हसवड येथे पालक सभेचे आयोजन केले होते. पालक सभेसाठी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, पालक प्रतिनिधी राजाराम गाडेकर व इतर नवनियुक्त प्रतिनिधी उपस्थित होते. आजची युवा पिढी अति मोबाईल वापर व  सोशल मीडियामुळे भरकटत चालली असल्याची तक्रार पालक मिटिंग मध्ये  चर्चेत  आली. याबाबत पालक, शिक्षक व संस्था व्यवस्थापन यामध्ये आवश्यक संवाद होऊन याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्या बाबत  सर्वानुमते ठरविण्यात  आले. क्रांतिवीर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरातील टेलिव्हिजन व मोबाईल  रात्री सात  ते साडेआठ या दीड  तास कालावधीत पूर्णपणे बंद करण्याबाबत चा ठराव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी मांडला. सदर ठराव  सर्वानुमते मंजूर  करण्यात आला. या ठरावाला नंतर सर्व विद्यार्थ्यांनीही हात वर करून सहमती दर्शवली. रोज रात्री  पालकांनी विद्यार्थ्यांना खात्रीशीरपणे अभ्यासाला बसवावे. स्वतःही त्यावर लक्ष देऊन आत्मपरीक्षण करण्याच्या निमित्ताने दीड तास घरातील टीव्ही तसेच स्वतःकडील मोबाईल बंद ठेवण्याबाबत ठरविण्यात आले.  विद्यार्थी हित जोपासून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे विश्वंभर बाबा यांनी सांगितले. शिक्षकाचे  कर्तव्य पालकांची जबाबदारी याबाबत सुलोचना बाबर यांनी  सविस्तर मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण उपक्रम, आगामी नियोजन   शिक्षक पालक तसेच विद्यार्थी जबाबदारी याबाबतची  तपशीलवार माहिती सुलोचना बाबर यांनी पालकांना दिली.



 यानिमित्ताने शिक्षक, पालक व संस्था व्यवस्थापन यामध्ये संवादामधून विद्यार्थी हित जोपासणे बाबत सकारात्मक चर्चा व ठराव करण्यात आले. या निमित्ताने अनेक पालकांनी मनोगत व्यक्त केले. अनिल कुमार काटकर यांनी सूत्रसंचालन केले तर तुकाराम घाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.