रसायनशास्त्र विषयात डॉ. पंकज विश्वनाथ पाताळे यांना पीएच. डी. पदवी प्रदान
(मुरूम प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत रसायनशास्त्र विषयात मुरुम येथील रहिवासी डॉ. पंकज विश्वनाथ पाताळे यांना नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला संशोधन प्रबंध प्रा. डॉ. जयश्री सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करून विद्यापीठाकडे सादर केला होता. त्यांना पीएच. डी. प्राप्त झाल्याबद्दल श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. राजकुमार रोहीकर, प्रा. डॉ. सुजित मटकरी, डॉ. सुशील मठपती, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अजिंक्य राठोड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार यांनी डॉ. पंकज पाताळे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.