क्रांतिवीर संकुलास 20 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट,

 क्रांतिवीर संकुलास  20  उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची  भेट,

    पालक सभेला मार्गदर्शन 



 म्हसवड... प्रतिनिधी 

 रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे कृषी पदवीधर 81 बॅचमधील अनेक सनदी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय 20 अधिकाऱ्यांनी  म्हसवड येथे सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या दर्जेदार शालेय उपक्रमशीलते बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात पालक सभेच्या निमित्ताने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांच्या दूरदृष्टीनुसार त्यांच्या मित्रपरिवारातील व राज्याच्या प्रशासनातील अनेक सनदी अधिकाऱ्यासह  20 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना यानिमित्त निमंत्रित करण्यात आले होते.   

           महाराष्ट्र राज्य दुग्धविकास  विभागाचे   माजी आयुक्त अजित पवार, जीएसटी विभागाचे माजी अप्पर आयुक्त विलासराव इंदलकर, राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी डॉ.चांगदेव बागल, नानासाहेब शेळके , हणमंतराव इंगवले, प्रकाश पवार, डॉ. विजय थोरात, डॉ. राम निगडे  , संभाजी सावंत,अशोक घोरपडे, काका क्षीरसागर, हणमंत खाडे, प्रकाश गडकरी, दिगंबर बाबर, आदिनाथ गौंडाजे, यांच्यासह उद्योजक हणमंतराव मोहिते, दिलीपराव ढमाळ धनंजय फाटक, सुभाष जाधव शेतीनिष्ठ चांगदेव मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



     या निमित्ताने शाळेचे विद्यार्थी  केंद्रीय संघ स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या श्रीधर रकटे, शुभम शिर्के , जीएसटी असिस्टंट कमिशनर श्रीनिवास कचरे, आयआयटी जोधपुर साठी निवडलेला  विद्यार्थी श्रेयश गोंजारी,  खेळाडू मिहीर काटकर , शिष्यवृत्तीधारक सुहानी नरळे, स्नेहल येवले , गणित ऑलिंपियाड राज्य रँक  विजेती वैभवी बाबर, तसेच स्वरांजली ढोले या गुणवंत  विद्यार्थ्यांचा सन्मान  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी  श्रेयस गोंजारी  यांनी तयार केलेल्या शालेय व्यवस्थापन ॲपचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला 

            या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, व पालक यांना मार्गदर्शन केले. कृषीमित्राने उभा केलेले क्रांतिवीर शैक्षणिक संकुल आमच्यासाठी भूषणावह असून विश्वंभर व सुलोचनाताई यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचे अनेकांनी भावनिकरित्या स्पष्ट केले .  कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर, हर्षदा बाबर , संकुलातील सर्व शिक्षक पालक उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी करून उपस्थितांना शाळेच्या उपक्रमशीलतेची माहिती दिली. सूत्रसंचालन पल्लवी जगताप यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे  आभार प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी  व्यक्त केले.

...