माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सामाजिक समता दिन वाचन करून साजरा...


 

(मुरुम प्रतिनिधी)

यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून दि. ८ ते १४ एप्रिल या सप्ताह कालावधीत संपूर्ण राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्ताने वाचन उपक्रम शनिवारी (ता.११) रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे होते. यावेळी माधवराव पाटील महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे,   उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. सुमित ढंगे, प्रा. प्रियंका काजळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. श्री माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने ग्रंथालयात वाचन उपक्रमांतर्गत दिवसभर वाचन करून हा दिवस साजरा करण्यात आला. प्रा. हर्षद बदोले, किशोर कारभारी, नितीन कंटेकुरे, मल्लिकार्जुन स्वामी, बालाजी शेळके, चंद्रकांत पुजारी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनंती बसवंतबागडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रफिक शेख तर आभार प्रा. वैष्णवी पाटील यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.                                                       फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सामाजिक समता कार्यक्रमाप्रसंगी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, रंगनाथन यांच्या प्रतिमेस महेश्वर होगाडे, राजकुमार देवशेट्टे, योगेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करताना.