डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश कारंडे यांची निवड !

 

(गणेश कारंडे यांचा सत्कार करताना डॉ.सुभाष वाघमारे व मान्यवर.)


सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरात वर्षभर व्याख्यानासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात.तेव्हा यावर्षी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश कारंडे यांची निवड  करण्यात आली.तेव्हा त्यांचा सत्कार प्रशांत झालटे,डॉ.सुभाष वाघमारे व चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते करण्यात आला.

    गेली ८ वर्षे झाली समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात असतात. यापूर्वी,बौद्ध व्यतिरिक्त ऍड.हौसेराव धुमाळ,प्रकाश फरांदे आदींची अध्यक्षपदी निवड करून समिती ही बहुजनांची असल्याचे अधोरेखीत करण्यात आली असुन आताही गणेश कारंडे यांची निवड करण्यात आली आहे.इतर निवडी पुढीलप्रमाणे आहेत.

    कोषाध्यक्ष - चंद्रकांत खंडाईत,प्रमुख सल्लागार म्हणून जेष्ठांची घोषणा करण्यात आली असुन इतर कार्यकारिणीही गठीत करण्यात येत आहे.

     याबाबतचा ठराव अनिल वीर यांनी मांडला.त्यास सर्वांनी एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे.यावेळी थेरो दिम्पकर (भन्ते),रमेश इंजे,प्राचार्य रमेश जाधव व असंख्य उपासक उपस्थीत होते.