घिगेवाडीत आजपासून ग्रामदैवत श्री काळूबाई यात्रेला सुरुवात व विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे


घिगेवाडी (ता. कोरेगाव

येथील काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि ९आज) व शुक्रवारी (दि. १०उद्या) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी काळूबाई देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. पहाटे ही मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करेल. यावेळी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ९.३० नंतर नटराज प्रोडक्शन 

प्रस्तुत अकलूज लावणी महोत्सव व पिंपरी चिंचवड प्रथम पारितोषिक विजेता कैरी मी पाडाची - शलाका पुणेकर आणि पार्टी मनोरंजनाचा  कार्यक्रम होणार आहे.