पिंपोडे बुद्रुक / प्रतिनिधी/अभिजीत लेंभे
पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांवरती कारवाई केली असून, बिचुकले येथून चोरीच्या मोटारसायकलसह एकूण दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दत्तात्रय धनसिंग पवार (वय ३३, रा. बिचुकले, ता. कोरेगव) याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वरिष्ठांच्या आदेशावरून सहा. पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदार हे सायंकाळच्या सुमारास वाठार ते बिचुकले मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना दत्तात्रय धनसिंग पवार (वय ३३, रा. बिचुकले, ता. कोरेगव) हा विना नंबरप्लेटची काळ्या रंगाची मोटारसायकल चालवत असताना आढळून आला. याबाबत संशय आल्याने त्याला थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केल्यावर त्याने घरी आणखी दोन मोटारसायकली असल्याचे सांगितले.
