गॅस सिलेंडर महागाईने साताऱ्यात साजरा झाला महिला दिन

 


(अजित जगताप)                  

सातारा दि:  भाजप पुरस्कृत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अकरा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून झालेली ही वाढ महिलांना दीन करणारी ठरली आहे. आखाती देशातून तेल व गॅसचा पुरवठा होत असला तरी या ठिकाणी युद्ध होत आहे त्यामुळे हे गॅस सिलेंडर वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मोदी है तो मुमकिन है.. यावर विश्वास ठेवला जर युद्ध पूर्णविराम झाल्यानंतर गॅस सिलेंडर दरवाढ कमी होईल का? असा मार्मिक प्रश्न साताऱ्यातील महिलांनी भाजपच्या महिला आघाडीला विचारला आहे.

 घरगुती सिलेंडरचे दर ६० रुपये वाढले तर  १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडर मध्ये ११५ रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ यांच्यामध्ये वाढ करण्याशिवाय हॉटेल, ढाबा, घरगुती खानावळ, खाद्य विक्री  टपरी आणि व्यवसायिकांना पर्याय राहिलेला नाही.            भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून बेरोजगारी, महागाई आणि गुन्हेगारी यांचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळत आहे. विश्वगुरू तिच्या धोरणामुळे देशालाच नव्हे तर गल्लीबोळात सुद्धा लोकांना शिमगा करावा लागत आहे. अशी आता काँग्रेस पक्षासारखे महिला वर्ग टीका करू लागलेले आहेत. 

      काँग्रेसचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते. त्यावेळेला गॅस सिलेंडरची वाढ झाल्यानंतर मोर्चा, निदर्शने व आंदोलन करणारे भाजपच्या महिला कार्यकर्त्या आता सत्तेत सहभागी झाल्याने मूग गिळून गप्प आहेत. त्यांना स्वातंत्र्य मिळाले नसून त्यांना आता इतर महिलांपुढे भाजप पक्षाचे ध्येय धोरण घेऊन जाण्यास अडचणी वाढत आहेत. निदान त्यांची अडचण ओळखून तरी गॅस दरवाढ मागे घ्यावी असे सुचित करण्यात आले आहे.                             आप की बार.. महागाई भाजपा सरकार.. अशी नवीन घोषणा दिली जात आहे.  ८मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गॅस सिलेंडर वाढ कमी करण्यासाठी भाजप पुरस्कृत केंद्र व राज्य सरकारला करामध्ये कपात करावी लागणार आहे. कारण , भारतीयांना जगणे मुश्किल झाले असताना आता पुण्यामध्ये स्मशान भूमीतील गॅस  वाहिनी बंद करण्याची वेळ आलेली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन गॅस पुरवठा करण्यास सुद्धा भविष्यात अडचणी येणार आहेत. एकूण सर्वच पातळीवर भाजपला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

      महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे गव्हाच्या सोबत किडे सुद्धा रखडले जात आहेत. अशी स्थिती राष्ट्रवादी व शिवसेनेची झालेली आहे. उज्वल योजनेच्या लाभार्थींसाठी तर आता पुन्हा एकदा जळण गोळा करण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये महिलावर्ग चिंताग्रस्त झाल्या असतानाच भाजप पुरस्कृत नारीशक्ती संगम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मधून महिला वर्ग बाजूला होत आहेत.

   आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना गॅस दरवाढीमुळे चांगलाच भडका उडाला आहे. महिलांच्या सबलीकरणाबाबत मार्गदर्शन करताना गॅस दरवाढीबाबत बोलताना भाजप नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. असे चित्र संपूर्ण देशात दिसत आहे. 

       सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल २०२५ मध्ये सिलेंडरच्या किमतीत. ५०  रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी स्थानिक विक्रीकर आणि मूल्यवर्धित करामुळे ही वाढ झाल्याचे  समर्थन केले होते. आता युद्धाचे कारण सांगून गॅस दरवाढीबाबत भूलथापा दिल्या जात आहेत. महिला दिन साजरा होत असतानाच महिलांना गोड सरबत दाखवून कडू डोस पाजला जात आहे. त्यामुळे महिला वर्गांना आता लाडक्या बहिणी योजनेचे कौतुक थांबून लाडक्या बहिणीला आधार देण्यासाठी महिला दिन तसेच रोजा निमित्त गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्यावी. अशी मागणी सातारा जिल्ह्यातील महिलांच्या वतीने शाहूपुरी येथील सौ. साक्षी समीर वहागावकर, सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला पदाधिकारी  सौ. वैशाली जाधव, श्रीमती नलिनी जाधव व करिष्मा सय्यद, रेखा सकटे यांच्यासह अनेक महिलांनी केली आहे. 

       दरम्यान , सातारा जिल्ह्यातील महिला वर्ग गॅस सिलेंडरच्या भाव वाढीमुळे त्रस्त असताना भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मौन धारण केले आहे. त्यांच्या या बोटचेपी धोरणामुळे भाजप गरीब व कष्टकरी आणि भाजपला मतदान करणाऱ्या हिंदू माता भगिनी  बाबतीत निर्दयी असल्याची टीका होऊ लागलेली आहे. आता गॅस दरवाढ मागे घेऊन आपण सर्वच लाडक्या बहिणींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. हे दाखवण्याची वेळ आली आहे. असेही महिलांनी नमूद केले आहे.  ________________________________.    फोटो--- गॅस सिलेंडर दर वाढ झाल्याने  त्रस्त झालेली साताऱ्यातील महिला   (छाया--- निनाद जगताप सातारा )