मुलांचे विश्व समजून त्यांच्यासाठी केलेले परिश्रम ही भविष्याची उत्तम संस्कार पेरणी असते.: डॉ. राहुल पालके

 *व्ही. के. इन्स्टिट्यूट ऑफ अबॅकसचे पारितोषिक वितरण संपन्न* 



 बार्शी: प्रतिनिधी

दि. २८ फेब्रुवारी शनिवार रोजी मातृमंदिर मंगल कार्यालय ढगे मळा येथे व्ही. के.इन्स्टिट्यूट ऑफ अबॅकस तर्फे तालुका पातळीवरील स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुका पातळीवरील कार्यरत विविध शाखांमधून एकूण ६० स्पर्धकांनी आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविला होता. सायं ठीक चार वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.राहुल पालके तसेच बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी श्री बसवराज पुरवंत हे उपस्थित होते.

 सुरुवातीला श्री विनोद कबाडे यांनी प्रास्ताविकपर बोलून डॉ.पालके तसेच श्री बसवराज पुरवंत यांचे स्वागत व सत्कार केला. स्पर्धांमधून सहभागींना पुढे जाण्याची उर्मी मिळतेच तसेच स्पर्धाही उत्साही वातावरणात असावी व आपण आपल्याशीच स्पर्धा करून रोजची प्रगती तपासून पहावी वमुलांचे विश्व समजून त्यांना घडविण्यासाठी केलेले परिश्रम ही भविष्याची उत्तम संस्कार पेरणी असते. असे बोधपर विचार डॉ. पालके व श्री बसवराज पुरवंत  यांनी मांडले. या स्पर्धेत कु. सार्थक सूळ, कु. विराज शिंदे, कु. पुष्कर तिकटे हे तिघेही आपल्या वयोगटांनुसार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.वनुजा कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील कार्यरत वेगवेगळ्या शाखांचे अबॅकस टीचर , सौ सारिका कबाडे, सौ रेखा तुपे, सौ ज्योती डांगे, सौ मोनिका कट्टीमनी, सौ शुभांगी मस्तुद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री यलाप्पा कट्टमणी,श्री प्रथमेश निरंजन व श्रद्धा, यशराज व कोमल कबाडे यांचेही विशेष परिश्रम लाभले. सहभाग  व विजेत्या स्पर्धकांना डॉ. पालके व श्री बसवराज पुरवंत यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.

 कार्यक्रमाची सांगता श्री विनोद कबाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून केले.