मिलिंद काळे महाबळेश्वर,
काल झालेल्या अपघाताची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अजय देशपांडे यांनी त्वरीत महाबळेश्वर वेण्णा लेक मधील धोकादायक वळणावरती रिफ्लेक्टर बसवून प्रवाश्यांना काही प्रमाणात दिलासा दिला.
सध्या महाबळेश्वर येथे दिवाळी हंगाम सुरू झाला आहे. सर्वच ठिकाणी पर्यटकांसह स्थानिकांच्या वाहनांची गर्दी आहे. वेण्णा लेक ते महाबळेश्वर या रस्त्यावरील ओढ्यावरील तीव्र वळणाचे काम नुकतेच सा.बां विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या वळणावर कठडा नसल्याने काल एका पर्यटकाच्या स्कॉर्पिओचा रस्ता सोडून खोल खड्ड्यात पडून अपघात झाला होता. दुर्दैवाने कोणतिही जिवीत हानी न होता सर्व प्रवासी सुखरुप असल्याने मोठी आपत्ती टळली. याची सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता अजय देशपांडे यांनी तातडीने दखल घेत त्वरीत ठेकेदाराकडून रिफ्लेक्टर बसवून घेतले. यामुळे शहरातून तत्पर सेवा दिल्याबद्दल शहरातून त्यांच्या कृतीचे स्वागत होत आहे.