शेत रस्त्याच्या भांडणात एक जणाचा बळी ,गोंदवले बुद्रुक येथील प्रकार, एक जणाला अटक तर दोन जण फरार

.                     मयत अनिल कदम

गोंदवले - गोंदवले बुद्रुक ता.माण या ठिकाणी शेत रस्त्याच्या भांडणावरून झालेल्या मारहाणीमुळे एक जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी एक जणाला पुण्यातुन ताब्यात घेतले आहे तर दोन जण अद्याप फरार आहेत.
याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदवले गावच्या हद्दीतील मळवी नामक शिवारात तक्रारदार यांचे शेतात  अनिल रघुनाथ कदम वय - ५५ वर्षे यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना तुम्ही आमच्या च्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचं नाही असं म्हटले. या कारणावरून तक्रारदार यांचे वडील अनिल कदम यांना शिवीगाळ करत दत्तात्रय यादव यांनी त्यांची दोन्ही मुले हर्षद आणि जयंत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीच्या साहाय्याने झालेल्या मारहाणीत कदम हे गंभीर जखमी झाले होते. यादरम्यान सदर भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तक्रारदार यांचे चुलते व चुलती यांना देखील हर्षद आणि जयंत या दोघांनी  लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या सह सपोनि अक्षय सोनवणे यांनी भेट दिली याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे करत आहेत.
छाया - मयत अनिल कदम