जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत महाबळेश्वरमध्ये वैविध्यपूर्ण रांगोळी स्पर्धा संपन्न.
मिलींद काळे महाबळेश्वर
पर्यावरणीय शाश्वततेच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनासह महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेदेचा नवरात्रोत्सव सज्ज आहे. माझी वसुंधरा 5.0 जल 3.5 उपक्रमांतर्गत यावर्षी प्रथमच, प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद एक वेगळा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महाबळेश्वर शहरातील महिलावर्गासाठी विविध स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर प्रेमी ग्रुप व हिलदारी याच्या संयुक्त विद्यामाने जागर श्री शक्तीचा या उपक्रमातर्गत महाराष्ट्राची संस्कृती या विषयांवर आधारित वैविध्यपूर्ण रांगोळी स्पर्धा गिरीस्थान नगरपरिषद शाळा क्र. १ व २ येथे सोमवार दि. ७/१०/२०२४ संपन्न झाली. सदरील रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. समाजाच्या जडणघडणीत नारी शक्तीचे योगदान अमूल्य आहे तरी सदरील आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन नाविन्यपूर्ण कल्पना या स्पर्धेतून सादर कराव्यात असे आवाहन याप्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी महिलांशी सवांद साधतांना केले तसेच सर्व सहभागी महिलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या वेळी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, वृक्षाधिकारी कल्याण हिवरे, शहर समन्वयक वैभव साळुंखे, सहा. स्वच्छता निरीक्षक आकाश चव्हाण, महाबळेश्वर प्रेमी ग्रुपचे श्रीकांत जाधव, अभिषेक साळुंखे, दुर्वेश प्रभाळे, वृषाली डोईफोडे, प्रसाद साळुंखे, अंकुश शिंदे, साहिल सुतार, हर्ष साळुंखे, वैभवी भोसले, पत्रकार अजित कुंभारदरे , प्रेषित गांधी, सादिक सय्यद, शाळा क्र १ चे मुख्याध्यापक संजय ओंबळे, शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक जनार्दन कदम, शाळेतील शिक्षक, हिलदारी टीम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे सर यांनी केले तर आभार महाबळेश्वर प्रेमी ग्रुपचे अभिषेक साळुंखे यांनी मानले.