म्हसवड(वार्ताहर )
महाराष्ट्रात माणदेशी फौंडेशनचे महिलांना लसीकरणाचे काम अतुलनीय असे आहे. बेल एअर हॉस्पिटल पाचगणी यांच्या वतीने माण तालुक्यातील 700 महिलांना मोफत लसीकरण करण्यात आले.
माण तालुक्यातील महिलांना माणदेशी फौंडेशन व बेल एअर हॉस्पिटल,पाचगणी यांच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते करण्यात आले.एकाच दिवसात 700 महिलांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी, प्रांताधिकारी सतीश सुर्यवंशी, तहसीलदार बाई माने, म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी सचीन माने, एपीआय बाजीराव ढेकळे,इ. मान्यवर उपस्थित होते.
माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्या म्हणाल्या, माण तालुक्यात महिला सक्षमीकरण चळवळ 1997 साली सुरु केली आहे. बँकिंग क्षेत्रात फौंडेशनच्या वतीने चांगले काम केले आहे. आता आरोग्य क्षेत्रात काम करण्याची संधी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सहकार्याने मिळाली आहे. बेल एअर हॉस्पिटल ,पाचगणी यांच्या मदतीने आम्ही आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. यापुढे अधिक काम करण्यासाठी आम्ही काम करणार आहे.माण तालुक्यातील जनतेला अधिक उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.
यावेळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, माण देशी फौंडेशन महाराष्ट्रात महिलांना लसीकरण करण्यात देत असलेले योगदान अमुल्य आहे. गोंदवले येथे कोविड सेंटर चालवत आहे. यांचे काम अधिक चांगले आहे. सध्या लसीचा तुटवडा आहे. शिरम कंपनीच्या वतीने पाचगणी यांनी माणदेशी फौंडेशन ला 3000 लस उपलब्ध करून दिली आहे. आणखी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
तसेच महिला च्या आरोग्याबाबत समाज जागृत नाही. यामुळे लोकसंख्येत पन्नास टक्के वाटा असणाऱ्या महिला वर्गांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. माणदेशी फौंडेशन व चेतना सिन्हा यांचे हे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे.
यावेळी.
प्रभात सिन्हा यांनी आभार व्यक्त केले.व फौंडेशन च्या कामाची माहिती दिली.
फौंडेशनच्या वतीने पाच कोविड सेंटरला दोन वेळेचे मोफत भोजन देण्यात येते आहे.
