मायणी दि. ८ (दत्ता कोळी) : -
येथील कला, वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मोराळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझं गाव कोरोना मुक्त गाव' अभियान राबविण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या निर्देशानुसार कोरोना विषयक प्रबोधनासाठी मोराळे व चितळी ही दोन गावे दत्तक घेण्यात आली आहेत. महाविद्यालय व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामस्थ व तरुणाईचे प्रबोधन केले जात आहे. जिल्हाधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, विद्यापीठातील समन्वयक यांचे ऑनलाईन प्रबोधनपर मार्गदर्शन आयोजित केले जाते. तसेच कोरोना साथ रोगा बद्दल अधिकृत माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित करून जनजागृती घडविली जाते.
या उपक्रमाअंतर्गत गरजूंना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप शिंदे,उपसरपंच प्रेमला निकम, ग्रामपंचायत सदस्य गिरीश घोलप, सौ. मनीषा पोपट शिंदे, सौ. अश्विनी शिंदे, सचिव जालिंदर शिंदे, किरण निकम, ग्रामसेवक सौ. आर. एस. पवार, प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, रासेयो प्रकल्प अधिकारी डॉ. उत्तम टेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत पी. जी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. सद्यस्थितीत गावात एकही करोनाबाधित रुग्ण नाही, याबद्दल सरपंच व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व काही ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:- "माझं गाव कोरोना मुक्त गाव"या योजने अंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने सॅनिटायझर चे वाटप करताना प्राचार्य सयाजी मोकाशी, सरपंच संदीप शिंदे,किरण निकम व अन्य मान्यवर(फोटो-दत्ता कोळी)
