उमरगा-
दि.७ उमरगा तालुक्यातील कडदोरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पं.स.उमरगा यांच्यावतीने कृषी मेळावा ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुनंदाताई रणखांब, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे उपसरपंच खंडू बालकुंदे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सभापती पाटील यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली महिलांचे सक्षमीकरण करण्यात उमेद चा खारीचा वाटा आहे, असे प्रतिपादन केले कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी उमेद च्या पोषण परसबाग विकसन मोहिमेबाबत माहिती दिली झिरो बजेट शेती करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याविषयी माहिती दिली गांडूळ खत, निंबोळी अर्क ,दशपर्णी अर्क, जैविक कीड नियंत्रण ,उत्पादक गट, बांधावर व सलग वृक्ष लागवड आदी बाबत सविस्तर माहिती दिली उपसरपंच खंडू बालकुंदे यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक परिचालक प्रशांत चव्हाण यांनी केले तर आभार माजी सैनिक रमेश मुगळे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी धनराज रणखांब,बालाजी शहाजी रणखांब सी.आर.पी. वैशाली चव्हाण कृषी सखी कांचन हिंगमिरे व शिवकन्या महिला ग्राम संघाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले...

