दहिवडीत मुद्रांक विक्रेते कार्यालय प्रांताधिकारी यांनी केली सील,गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या कोरोना चाचणी, कारवाई करताच शुकशुकाट

 

दहिवडी/प्रतिनिधी: विनाकारण गर्दी करून कोरोना विषाणूचा वाढत असल्याने दहिवडी ता .माण येथील तहसील कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेते कार्यालय, हॉटेल्स, दुकाने प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी मोठी कारवाई करून सील केली आहेत, तसेच पुढील आदेश येईपर्यंत सील काढू नये अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.



माण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना आज प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी अनेकदा सूचना करून देखील दुर्लक्ष करणारे मुद्रांक विक्रते, हॉटेल्स, दुकाने सील केली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हा सील काढू नये अशा सक्त सूचना सर्कल अधिकारी यांना दिल्या आहेत. दहिवडी नगरपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी पथक बोलावून स्थानिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांच्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या.तपासणी व कारवाई सुरू करताच परिसरात तात्काळ शुकशुकाट झाला. मुद्रांक विक्रेत्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता तात्काळ शटर खाली घेऊन सील करण्यात आले, त्यामुळे अनेक मुद्रांक विक्रेत्यांची आतील संगणक प्रणाली सुरूच होती. सील केल्या नंतर कार्यालया बाहेरून विद्युत पुरवठा खंडित करून आतील सुरू असलेली प्रणाली बंद करण्यात आली.


दहिवडी: येथील तहसील कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांची कार्यालये सील करताना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व कर्मचारी. (दौलत नाईक, दहिवडी)