गोंदवले- मराठी साहित्य मंडळ वानवडी -
बी.टी.कवडे रोड शाखा पुणे , मराठी साहित्य मंडळाचे जेष्ठ साहात्यिक डाॅ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवि गोलघुमट , यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्ताने आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे व राष्ट्रीय सरचिटणीस निलीमा जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्षा हर्षदा झगडे यांच्या सहकार्याने ऑनलाईन राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
सदर स्पर्धेसाठी बहुसंख्य स्पर्धकांनी ठाणे,मुंबई,पुणे,सातारा या जिल्ह्यामधुन उत्तम प्रतिसाद लाभला होता नवोदित कथालेकांनी आपला सहभाग नोंदवला होता .या स्पर्धेत प्रामुख्याने शालेय गट, खुलागट, ऊत्तेजनार्थ आशा क्रमाने निवड करण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यातून माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणगंगानगर येथील मुख्याध्यापिका श्रीमती दयाराणी विलासराव खरात यांचा खुल्या गटात राज्यस्तरिय स्पर्धेत तृतीय क्रमांक आला.
दयाराणी खरात यांच्या कथेची निवड करण्यात आली त्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे, तसेच डिसेंबर मध्ये होणा-या राज्यस्तरिय सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनात त्यांचा यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन लेखिका सुरेखा औसेकर पुणे, लेखिका मनाली साळवी पुणे, लेखक विष्णू भोसले पुणे, कवयत्री सानिका कदम अलिबाग लेखक मनस्वामी फिलिप पुणे या परिक्षकांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
दयाराणी खरात यांच्या या यशाबद्दल माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एल.एम.पिसे, विस्तार अधिकारी सौ.सोनाली विभुते,संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख नारायण आवळे व माण तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक/ शिक्षिका यांनी अभिनंदन केले.
