म्हसवड दि (प्रतिनिधी)
- येथील माणदेशी फौंडेशन म्हसवड व बेल-एअर हॉस्पिटल, पाचगणी यांचे संयुक्त विद्यमाने महिलासाठी
मोफत कोव्हिड - 19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. दिनांक ७, ८, ९ व १० जुलै २०२१ रोजी होणाऱ्या या लसीकरणाचा फायदा महिलांनी घ्यावा असे आव्हान माणदेशी फौंडेशन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे.यावेळी संस्थेच्या सीईओ सौ. रेखा कुलकर्णी उपस्थित होत्या.
कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंब उधवस्त झाली असून अनेकांनी आपले प्राणही गमावले असताना
सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून छोटीसा खारीचा वाटा म्हणून माणदेशी संस्थेने हजारो गरीब कुटुंबाना शिधा वाटप, पीपीई किट, मोफत जेवण तसेच महिलांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीच्या गोळ्या सुद्धा पुरवण्यात आल्या.बअसून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीन हजार N95 मास्क व दोन हजार लिटर सानिटायझर देण्यात आले. आहे या उपरोक्त गोंदवले बुद्रुक येथे माण तालुक्यात पहिले सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारले. त्याचा बहुतांश
रुग्णांना फायदा झाला.
याचाच पुढचा भाग म्हणजे आता माण देशी फौंडेशन महिलांना कोरोना प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याचे ठरविले आहे.
अपुऱ्या लस उपलब्ध होत असल्याने महिला वर्गाला ताटखळत बसावे लागत आहे शिवाय दिवसभर थांबून
शेवटी घरी परतावे लागत असल्याने माणदेशी फौंडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले व यासाठी बेल-एअर हॉस्पिटल, पाचगणी यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. म्हणून दिनांक ७ जुलै रोजी पासून सुरु होत असलेल्या मोफत शिबिरास समस्त माणदेशी महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे.
मोफत लस हि सिरम इन्स्टिटयूट पुणे यांची कोविशिल्ड हि देण्यात येणार आहे. तरी ज्या महिलांनी अदयाप पहिली लस घेतली नसेल. त्यांनी आपले नाव नोंदणी माणदेशी फौंडेशन संस्थेकडे करावी. त्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. वनिता पिसे ९४२१२१२०७३
योगिता झिमल ९७६७७९७१२८ शाहीन मुलाणी ९९७५१३३४०० लता जाधव ८००७९८५२९९
मोफत लसीकरण शिबिर हे एकूण सलग चार दिवस चालणार असून सिरम इन्स्टिटयूट पुणे यांची लस सुरक्षित व शासन प्रमाणित आहे .
ही लस माणदेशी संस्थेच्या म्हसवड येथील मुख्य कर्यालयात सकाळी ९ वाजता मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या उपस्थितीत दिली जाणार आहे. याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी व निसंकोच होवून जास्तीत जास्त महिलांनी या लसीकरण शिबिराचालाभ घ्यावा असे आव्हान चेतना सिन्हा यांचे वतीने करण्यात येत आहे.
लस घेतलेल्या महिलांना यावेळी माण देशी फौंडेशनच्यावतीने रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
