यशवंतराव चव्हाण विद्यालयात वसुंधरा ग्रुपचा यथोचित सन्मान

 

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी /अभिजीत लेंभे


  यशवंतराव  चव्हाण विद्यालयात
गेल्या महिनाभरात वसुंधरा पर्यावरण ग्रुप पिंपोडे बु॥ यांच्याकडून स्वपरिश्रमाने सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाच्या आवारात संवर्धनाची जबाबदारी शिरावर घेवुन,वेगवेगळ्या प्रकारची एकून  २२ झाडे लावण्यात आली.

    या कामाची दखल घेत दि  ६/७/२०२१ रोजी रयत  शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय  अधिकारी  श्री एस जे गोडसे साहेब यांच्याकडून वसुंधरा पर्यावरण ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांना सन्मानाने  पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी  श्री  जी . स.गोडसे साहेब, तासगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. जी . एस. घाडगे ( सर), मा.पंचायत समिती सदस्य श्री .अशोकराव लेंभे ( आबा) , मा. संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना श्री पोपटराव निकम  ( काका) ,यशवंतराव विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले सर, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वसु़ंधरा पर्यावरण ग्रुप च्या कामाची प्रशंसा करुन सर्वाना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.