औंध वार्ताहर
औंधसह परीसरात संत शिरोमणी सावता माळी यांची 725 वी पुण्यतिथी अतिशय साध्यापणाने साजरी करण्यात आली.
संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त दरवर्षी भजन किर्तन, प्रतिमेची मिरवणूक, व्याख्यान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते मात्र यंदा कोरोनाचे सावट डोक्यावर असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावतामाळी पुण्यतिथी कार्यक्रम देखील अतिशय साध्यापणाने साजरा करण्यात आला. सावता माळी मंदिरात शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून आणि शारीरिक अंतर ठेवून मंदिरातील मुर्तीला अभिषेक करण्यात आला. तसेच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
औंध, वडी, त्रिमली, जायगांव, वरुड पळशी आदी ठिकाणी अतिशय साध्या पध्दतीने शांततेत कार्यक्रम पार पडला.