भाजप व घटक पक्षांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी राज्यभर दूध एल्गार आंदोलन.



राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनासोबत दूधाची किटलीही पाठवली.

 इंदापूरमध्ये भाजप व घटकपक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन.



इंदापूर : प्रतिनिधी -

               गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान  तसेच दूध पावडरला प्रतिकिलो पन्नास  रुपयांचे अनुदान सरकारने द्यावे या मागणीकरिता भाजप,रयतकांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने   १ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.  यासंदर्भात भाजप कार्यकारणीचे निमंत्रित सदस्य व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये  आज (दि.२०) रोजी  इंदापूर येथे तहसिलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.
     यावेळी भाजपचे निमंत्रित  कार्यकारणीचे सदस्य,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले  भाजपचे माऊली चवरे,
रयत क्रांतीचे निलेश देवकर,आरपीआय अध्यक्ष संदिपान कडवळे,आरपीआय जिल्हासंघटक शिवाजी मखरे, इंदापूर भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद यावेळी उपस्थित होते.
        महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून नाकारला  जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व नुकसान,राज्यामध्ये अतिवृष्टीमुले अनेक ठिकाणी पीकांचे नुकसान  झाले आहेे. या झालेल्या नुकसानीचे शासनाकडून शेतक-यांना कोणतीही मदत अद्याप देण्यात आली नाही.शेतकरी या संकटामधून जात असताना दुसरीकडे दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दूध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वतः हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकिय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
      या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स,चहाची दुकाने बंद असल्यामुळे दूधाची मागणी घटली आहे.  दूधाच्या विक्रीमध्ये ३० टक्क्यापर्यंत घटली आहे. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध १५ ते १६ रु. दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे दूधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रु.प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दूध खरेदी केली जात आहे. काही ठराविक दुध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्याला व दूध उत्पादकांना शासनाने वार्यावर सोडले आहे.
        गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी करीता प्रति किलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून ३० रुपये प्रति लिटरने दुधाची खरेदी या न्याय मागण्याकरिता आम्ही सर्वजण १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करीत असल्याची माहिती यानिवेदनाद्वारे देण्यात आली.

चौकट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनासोबत  दुधाची किटली ही पाठवली.
==

      भाजप,रयतकांती संघटना,शिवसंग्राम, रासप, रिपाई महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने  १ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करणार आहे.  यासंदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात आले.या निवेदनासोबत गायीचे पवित्र दूध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहका-यां करिता पाठवित आहोत. या पवित्र दुधाचे प्राषण करून आपण न्याय बुध्दीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षाच्या दृष्टीने त्यांना निवेदनासोबत दूधाची किटलीही पाठविण्यात आली आहे.असे निवेदनात म्हटले आहे.