इंदापूर परिसरात कोरोनाचा वाढता आलेख तब्बल १५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह.



इंदापूर : प्रतिनिधी (दि.१५जुलै)

    इंदापूर तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. दि.१३ जुलै रोजी ग्रामीण भागातील ५ व शहरातील ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहीती समोर आली होती. असे असतानाच आज दि.१५ जुलै रोजी तालुक्यातील १५ व्यक्तींची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असल्याची माहीती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.

     यात ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश असून यामध्ये अकोले येथील एकाच कुटूंबातील ९ व्यक्ती कोरोनाची लागण झाली आहे. तर निमगांव केतकी येथील एका पुरुषाला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय इंदापूर शहरातील (दत्तनगर) परिसरातील ५ व्यक्तींची कोरोना चाचणी ही पाॅझिटीव्ह आली असून या सर्वांवर इंदापूर कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत. सध्या इंदापूर तालुक्यात कोरोनाचे ३४ अॅक्टीव्ह रुग्ण असून एकूण रुग्णांची संख्या ७४ जावून पोहोचली आहे.


 : पुणे,बारामती,सोलापूर मध्ये लॉकडाऊन जाहिर ..इंदापूरमध्ये लॉकडाऊन  कधी ?? नागरिकांचा सवाल....

     संपूर्ण देशभरामध्ये कोरोना चे रुग्ण वाढत असताना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड लॉकडाऊन करण्यात आले. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याच्या शेजारील बारामतीमध्येही वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे  आजपासून त्याठिकाणी लॉकडाऊन जाहिर झाले आहे. परंतु इंदापूरात लॉकडाऊन करण्यास उशीर का?? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुणे, सोलापूर, बारामती प्रमाणे इंदापूरही काही दिवसांसाठी लॉकडाऊन करुन कोरोनाची साखळी तोडावी अशी मागणी नागरिकांमधून  होत आहे.  जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये तसेच प्रशासकीय नियम कडक करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.