कर्जत : वार्ताहर-
कर्जत शहरात कोरोना चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा गुरुवार पासून सुरू होणार होती परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर कर्जत सह तालुक्यात तीन दिवस जनता कर्फ्यू लावला असून बंदोबस्तात वाढ केली आहे
कर्जत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर यांचा कोरणा अहवाल पॉझिटिव आल्याने कर्जत शहरातील जनतेत घबराहट निर्माण झाली आहे .
डॉक्टरांच्या संपर्कात जे जे आले त्या सर्वांची माहिती गोळा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे
स्टेट बँक बंद
कोरोना च्या व रथयात्रा उत्सवानिमित्ताने प्रशासनाने तीन दिवस कर्फ्यू लावल्याने कर्जत येथे कडकडीत बंद पाळला जात आहे तर भारतीय स्टेट बँक कर्जत शाखाही शनिवार पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे स्टेट बँक सोमवारीच उघडणार असल्याने ग्राहकांची ची मोठी गैरसोय झाली आहे