राहायला घर नसल्याने पिंपोडे बुद्रुक येथील गरीबाचा संसार भर पावसात उघड्यावर 



पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी अभिजीत लेंभे
ऊन- वाऱ्याची तमा न बाळगता कुटुंबाला आधार देत गरीब कुटुंबे जीवन जगत आहेत. मात्र मायेचा हात  देणारे मता पुरतेच त्यांचा वापर करीत असल्याने राहायला घर नाही भर पावसात जीवन जगत असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की वाघोली,पिंपोडे बुद्रुक परिसरामध्ये अनेक कुटुंबे ही पाल ठोकून राहत आहेत. त्यामध्ये गोपाळ समाज ,कातडी समाज आदि बेअर  समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अनेकाचे स्थानिक या ठिकाणी मतदान आहे .परंतु  निवडणूक काही पुरतेच राजकीय पुढारी त्यांच्या मताचा वापर करीत आहेत परंतु सध्या पावसाने हजेरी लावली आहे उघड्यावरचे  जीवन त्यांनीच सहन करावे गरिबांचा वाली हाच एकमेव देवता आहे जैसे ठेवीले तसेची राहवे. असेच म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही गरिबांना कोण वाली असा प्रश्न निर्माण होत आहे खरोखरच ज्याला पोटभर अन्न मिळते त्यांनाच लोकनेते मदत करीत आहेत .परंतु खरी गरज आहे ती गोपाळ समाज, कातकरी समाजाला सध्या कोरोना मुळे गोपाळ समाजाला  हाताला काम मिळेना लग्नसराई बंद असल्याने बॅंड व्यवसाय बंद झाला. जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने अशा गरीब समाजाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा हा समाज करीत आहे.